Home » जळगाव » मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून !

मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असतांना आता मैत्रिणीची छेड काढल्याने झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना जांभुळवाडी तलावाच्या परिसरात घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डींग, भूमकर वस्ती, नऱ्हे, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय २१, रा. प्रतीक हाईट्स, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, सिंहगड रस्ता) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सूरज, दीपक, रोहित हे मित्र आहेत. मैत्रिणीची छेड काढण्यावरुन रोहित आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. रोहित, सूरज, दीपक हे शनिवारी (१४ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास आंबेगाव परिसरातील जांभुळवाडी तलावाजवळ गेले होते. तेथे सूरज, रोहित यांच्यात वाद झाला. वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपकने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या सूर्यवंशीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक गोरे तपास करत आहेत

 

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *