Home » जळगाव » अनुराग कॉलनीत भीषण अपघात : ट्रॅक्टर चालक जागीच ठार !

अनुराग कॉलनीत भीषण अपघात : ट्रॅक्टर चालक जागीच ठार !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरात आज शुक्रवारी (दि. 12) सकाळी 11वाजता सिमेंटने भरलेला ट्रॅक्टर चढावावर जात असताना ताबा सुटून पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. मृत चालकाचे नाव गणेश मोरसिंग चव्हाण (वय 47, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गणेश चव्हाण हे ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी (दि. 12) सकाळी त्यांनी रेल्वे मालधक्क्यावरून ट्रॅक्टर (क्र. एमपी-68 ए 0646) सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते अनुराग कॉलनीतील तीव्र चढावावरून जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि वाहन पलटी झाले. त्यामुळे चव्हाण ट्रॅक्टरखाली दबले जाऊन गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कॉन्स्टेबल योगेश माळी, संदीप सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि झुलालसिंग परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून चव्हाण यांना बाहेर काढण्यात आले. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *