Home » राष्ट्रीय » महामार्गावर भीषण अपघात; आमदारांच्या मर्सिडीजखाली 4 वर्षांची मुलगी गंभीर !

महामार्गावर भीषण अपघात; आमदारांच्या मर्सिडीजखाली 4 वर्षांची मुलगी गंभीर !

पुणे : वृत्तसंस्था 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कारने 4 वर्षीय बालिकेला उडवल्याची धक्कादायक घटना रविवारी बोऱ्हाडेमळा येथे घडली. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

घटना रविवारी दुपारी पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील बोऱ्हाडेमळा येथील ह्युंदाई शोरूमसमोर घडली. आमदार ज्ञानेश्वर कटके हे शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी पुण्याहून शिरूरकडे येत होते. त्याचवेळी शुभ्रा एकटीच महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. अचानक ती कारच्या आडून आमदार कटके यांच्या काळ्या मर्सिडीज (MH 12 NX 1391) समोर आली. चालकाने तातडीने ब्रेक दाबले, परंतु कारचा वेग जास्त असल्यामुळे बालिकेला जोरदार धडक बसली. शुभ्रा चेंडूसारखी हवेत उडून दूर रस्त्यावर पडली. अपघात होताच आमदार कटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिला तातडीने उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या धडकेत मुलीच्या डोके व जबड्याला गंभीर इजा झाली असून काही दातही पडले आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, महामार्गावरील प्रचंड वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर 4 वर्षांची शुभ्रा एकटीच रस्ता ओलांडत होती याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अपघाताच्या वेळी मुलीसोबत तिचे पालक नव्हते, हेही समोर आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *