Home » जळगाव » गावठी पिस्तुल घेवून दहशत : एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

गावठी पिस्तुल घेवून दहशत : एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील बीग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा गावठी पिस्तुल व जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बिग बाजारकडे जाणाऱ्या रोडवर दोस्ती बियर शॉप समोरील सर्कलजवळ संशयित गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यांनी लागलीच सपोनि सुरेश आव्हाड, सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ सतीश पाटील, उमेश भांडारकर योगेश पाटील, दिपक शिरसाठ, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, भगवान पाटील, पोलीस नाईक भगवान मोरे, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि राहूल पांचाळ यांचे पथक रवाना केले.

या पथकाने संशयित हर्षल जितेंद्र कदम याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून गावठी पिस्तूल आणि जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल अशोक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दीपक सुरवळकर करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *