Home » राष्ट्रीय » स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली बाहेरील ते होर्डिंग अनधिकृत : ॲड.पियुष पाटलांची तक्रार !

स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली बाहेरील ते होर्डिंग अनधिकृत : ॲड.पियुष पाटलांची तक्रार !

जळगाव : प्रतिनिधी

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले स्वातंत्र्य चौक या ठिकाणी असलेली सुप्रसिद्ध हॉटेल रूपाली या बाहेर आकर्षणाचे असलेली LED होल्डिंग, तसेच त्या ठिकाणी असलेली लोखंडी होल्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे सदर होल्डिंग गेल्या ०७ वर्षापासून या ठिकाणी अनाधिकृत असल्यावर देखील मनपाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली होती त्या अनुषंगाने ही माहिती त्यांना प्राप्त झालेली आहे. याबाबत गेल्या दोन दिवसालाच माजी महापौर विष्णू भंगाळे यांचा हॉटेल रूपाली समोरील गांधी उद्यान बाहेरील होकर्स यांच्यासोबत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून झालेला वाद व बाचाबाची यामध्ये हॉकर्स संघटनेच्या वतीने पियुष पाटील यांनी उडी घेतली होती.यावेळी भंगाळे यांनी संबंधित हॉकर्स ला अर्वाच्या भाषेत शिवीगा करत उद्यापासून तुमच्या गाड्या या ठिकाणी लागू देणार नाही म्हणत धमकावले होते. याच गोष्टीचा आधार घेत पाटील यांनी गोरगरिबांवर – कष्ट करून हातावर पोट भरणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा भंगाळे यांनी आधी स्वतःचे अनधिकृत होल्डिंग काढावे – ०७ वर्षापासून अनाधिकृत रित्या ते त्या ठिकाणी आहे त्याचा दंड तसेच कर मनपाने व्याजासह वसूल करावा तसेच संबंधित होल्डिंग मालकांवर व जागा मालकांवर गुन्हे दाखल करावे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *