September 22, 2026 3:39 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग : लाखोंच्या नुकसानीचा अंदाज !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौफुलीजवळ असलेल्या एन सेक्टरमधील ‘आर्यव्रत’ नावाच्या केमिकल कंपनीला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य व मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार,  या आगीची तीव्रता इतकी […]

बिहारच्या निकालानंतर कॉंग्रेसवर ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार आहे. मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. तर महागठबंधनला अपयश मिळताना दिसत आहे. यावरून सध्या बिहारमध्ये भाजपकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. समोर येत असलेल्या या निकालांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. अंबादास […]

कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? निकालांमध्ये भाजप चमकला, महागठबंधन मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहारमध्ये नीतिशकुमार की तेजस्वी यादव?कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे. दरम्यान , आज सकाळपासून सुरु असणाऱ्या मतमोजणीच्या कलांमध्ये एनडीएतील मित्र पक्षच आघाडी आणि पिछाडीवर […]

२ वर्षांच्या चिमुकलीसाठी धावले ‘रक्तदान दूत’ : शिवाजी पाटील यांचे ५६ वे रक्तदान ठरले जीवनदायी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कावीळ आणि निमोनियाने आजारी असलेल्या २ वर्षीय चिमुकलीला रक्ताची तातडीने गरज असताना, रक्त मिळविण्यासाठी सर्वत्र धावपळ झाली. मात्र, कुठेही रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी गावाचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांना संपर्क केला. सरपंचांनी तात्काळ मदतीसाठी गिरीश भाऊ महाजन यांचे आरोग्य दूत शिवाजी पाटील यांच्याशी […]

जळगाव पोलिसांची पहाटे तीन तास मोहीम : तब्बल १०४ गुन्हेगार ताब्यात !

जळगाव :  प्रतिनिधी जळगाव शहर पोलिसांनी आज (दि. १४) पहाटे ४ ते ७ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर, एमआयडीसी, शनिपेठ आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा […]

दहशत कमी करण्यासाठी खुनातील आरोपींची जळगावातील भररस्त्यात धिंड

जळगाव : प्रतिनिधी शहरात गाजलेल्या आकाश ऊर्फ टपऱ्या युवराज कोळी खून प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही मुख्य आरोपींची गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी, सायंकाळी ५:३० वाजता शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून धिंड काढण्यात आली. त्यांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस आणि आरसीपी पथकाने ही कारवाई केली. ९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता किरकोळ कारणावरून वादातून आकाश ऊर्फ टपऱ्या […]

अंगावर गरम पाणी पडल्याने चार वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाटिका आश्रम परिसरात अंगावर गरम पाणी पडून झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एका चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन जितेंद्र पाटील (वय ४, रा. वाटीका आश्रम, जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. […]

भुसावळातील आठ उपद्रवींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव !

भुसावळ : प्रतिनिधी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ पोलिस प्रशासनाने सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यांकडून आठ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी दिली. या प्रस्तावांमध्ये वारंवार गुन्हे […]

रावेरमध्ये निवडणूक पूर्व धडक कारवाई : कारमधून २.५६ लाखांची रोकड जप्त

रावेर : प्रतिनिधी  नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थिर सर्वेक्षण पथकाने गुरुवारी दुपारी ३.३० वाजता सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनातून २ लाख ५६ हजार रुपयांची अवैध रोकड जप्त केली. जिल्ह्यातील ही निवडणूक अनुषंगाने झालेली पहिलीच मोठी कारवाई ठरली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बन्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर उभारलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून गुरुवारी नियमित तपासणी सुरू […]

स्वातंत्र्य चौकातील हॉटेल रूपाली बाहेरील ते होर्डिंग अनधिकृत : ॲड.पियुष पाटलांची तक्रार !

जळगाव : प्रतिनिधी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले स्वातंत्र्य चौक या ठिकाणी असलेली सुप्रसिद्ध हॉटेल रूपाली या बाहेर आकर्षणाचे असलेली LED होल्डिंग, तसेच त्या ठिकाणी असलेली लोखंडी होल्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे सदर होल्डिंग गेल्या ०७ वर्षापासून या ठिकाणी अनाधिकृत असल्यावर देखील मनपाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे. […]

error: Content is protected !!