Home » जळगाव » घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी : चोरट्यांनी मारला डल्ला !

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी : चोरट्यांनी मारला डल्ला !

नशिराबाद : प्रतिनिधी

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातून रोख १२ हजार रुपयांसह टीव्ही, मोबाइल, सोन्याचे दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ११ जुलै रोजी द्वारकानगरात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,नशिराबाद येथील खालच्या अळी परिसरातील रवींद्र रामदास चौधरी यांचे सासरे द्वारकानगरात राहतात. ११ जुलै रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्धाच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून रोख १२ हजार रुपये, आठ हजार रुपयांचा टीव्ही, नऊ हजार रुपयांचा मोबाइल व ३५ हजार रुपयांचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास सपोनि ए. सी. मनोरे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *