पाचोरा : प्रतिनिधी
शेतमजुरास रात्रपाळीचे काम सोपवून मालकाने ३१ वर्षीय पीडितेचा पती घरी नसल्याचा गैरफायदा घेत महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात समाधान कैलास पाटील (४५) या शेतकऱ्याकडे महिलेचा पती व महिला शेतमजूर म्हणून काम करीत असताना २७ एप्रिल रोजी पीडित महिला शेजारीच आरोपीच्या पत्नीसोबत चारा भरण्याचे काम करीत होती. यावेळी शेतकऱ्याची पत्नी बाजूला गेली असताना पीडित महिलेशी आरोपीने लगट केली. ही घटना पीडितेने पतीस सांगितली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
१ मे रोजी रात्री आरोपीने पीडितेच्या पतीस शेतात रात्रीचे ट्रॅक्टरने नांगरटी चालू आहे. त्या ठिकाणी कामावर जाण्याचे सांगितले. याचा गैरफायदा घेऊन आरोपी हा रात्री साडेअकराच्या सुमारास पीडितेच्या घरी आला असता पीडितेने पती आल्याचे समजून दरवाजा उघडला. यावेळी आरोपीने पीडितेस तोंड दाबत तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी पीडितेने आरोळ्या मारल्या. कामावरून पती आल्यानंतर महिलेने झालेला अतिप्रसंग पतीस सांगितला. उशिराने पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे



