जळगाव ; प्रतिनिधी
वाहनात निदर्दीपणे कोंबून कत्तीसाठी घेवून जाणारे वाहन गिरणा पंपिंग रोडवरील श्याम नगरजवळ पोलिसांनी पकडले. वाहनातून तीन गोवंशाची सुटका करुन त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. ही कारवाई दि. २६ रोजी सकाळी ६ वाजता केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील श्याम नगरजवळून दि. २६ रोजी सकाळी ६ वाजता (एमएच १३, सीवाय ४४८३) क्रमांकाच्या वाहनात अत्यंत निदर्यापणे गोवशांची कोंबून कत्तलीसाठी त्यांची वाहतुक करणारे वाहन रामानंद नगर पोलिसांनी पकडले. त्या वाहनात निदर्दीपणे कोंबलेल्या तीन गोवंशाची सुटका करुन त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी वाहन चालक जितेंद्र गोपाल कोळी (रा. मोहाडी, ता. जळगाव), शेख इब्राहीम शेख अब्बास (रा. शिरसोली, ता. जळगाव) व शेख मुस्ताख शेख इस्माईल (रा. पिंप्राळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहे



