नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला अटक करण्यात आली आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्याच्या टाकेद बुद्रुक येथील एका मुख्याध्यापकाने १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील शाळेत विद्यार्थिनी सहावीत शिकत आहे. १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला वर्गशिक्षक गोरख जोशी याने मुख्याध्यापक तुकाराम साबळे याच्या घरी पाठवले होते. त्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा तिला तिच्या घरी पाठवून दिले.
दरम्यान, अल्पवयीन मुलीगी घरी आल्यानंतर तिला त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी मुलीला विचारले असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी यांना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकबी करत आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



