Home » राष्ट्रीय » डाळ साठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडले : बापलेकाचा दुर्देवी मृत्यू !

डाळ साठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडले : बापलेकाचा दुर्देवी मृत्यू !

यवतमाळ : वृत्तसंस्था

 राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता यवतमाळ शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. डाळ साठवणूकीचे स्टोरेज अंगावर पडल्याने सुपरवायझरसह कामगार बापलेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. यवतमाळ येथील लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या मनोरमा जैन दालमील येथे मंगळवारी ( दि. 15) दुपारी घडली. भावेश कडवे ( रा. वर्धा) असे मृत सुपरवायझरचे नाव असून, मुकेश सुरेश काजले आणि सुरेश काजले रा. रायपूर खंडवा (मध्यप्रदेश) असे मृत बापलेकांची नावे आहेत. दिलीप आणि करणसिंग धुर्वे हे कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात मनोरमा जैन दाल मिल आहे. या दालमिलवर अनेक कामगार कार्यरत आहेत. मंगळवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतांना डाळ साठवणुकीचे स्टोरेज अचानक सुपरवायझर भावेश कडवे आणि मजूर बापलेक सुरेश कडवे, मुकेश कडवे यांच्या अंगावर पडले. त्यामूळे या स्टोरेजखाली दबून तिघांचाही मृत्यू झाला. तर दिलीप आणि करणसिंग धुर्वे हे दोघे मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्टोरेजखाली दबलेल्या मजूरांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *