जळगाव : प्रतिनिधी
अमली पदार्थ विक्री प्रकरणात सुरत पोलिसांना हवा असलेल्या नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून सुरत पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत शहरात १९८ ग्रॅम एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ पकडल्यानंतर नाझीम रशीद कुरेशी याच्या शोधार्थ सुरत पोलिस जळगावात आले होते. मात्र तो त्यांच्या हाती लागला नव्हता. २० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अटक केले.
दरम्यान, शनिवारी (२० सप्टेंबर) रात्री जेके पार्कनजीक सहा ग्रॅम ‘एमडी’ या अमली पदार्थासह अटक केलेल्या महमूद हनीफ पटेल (३५, रा. मास्टर कॉलनी) याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे



