Home » जळगाव » तीन रुग्णालयात नेल्यावर देखील तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

तीन रुग्णालयात नेल्यावर देखील तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

हृदयविकाराचा त्रास होत असलेल्या रुग्णाला तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे भूषण बाळकृष्ण महाजन (३५, रा. रामानंद नगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे यासंदर्भात रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात नोकरीस असलेले भूषण महाजन (रा. रामानंद नगर) यांना गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना अन्य रदयविकारतज्ज्ञांकडे घेरून जा असे सांगितले. नंतर पुन्हा दोन खासगी रुग्णालयांमध्ये उपचारास नकार दिला. नंतर चौथ्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. रुग्णाला वेळीच व योग्य उपचार मिळाले नाही. या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताचे आतेभाऊ योगेश पाटील यांनी केली

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *