Home » जळगाव » आ.खडसेंच्या बंगल्यावर चोरी प्रकरण : पोलिसांनी चोरट्यांना आश्रय देणाऱ्याला घेतले ताब्यात !

आ.खडसेंच्या बंगल्यावर चोरी प्रकरण : पोलिसांनी चोरट्यांना आश्रय देणाऱ्याला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरी करण्यापूर्वी व नंतर चोरटे मास्टर कॉलनीतील नातेवाइकांकडे थांबले होते. चोरट्यांना आश्रय देणारा नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी) याला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम नगरातील खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली होती. त्यांच्या बंगल्यातून ३७ हजारांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. चोरी केल्यानंतर चोरटे तीन बॅग घेवून दुचाकीवरुन ट्रिपलसीट जातांना शेजारील बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. रामानंद नगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. खडसेंच्या घरी चोरी करणारे चोरटे हे काही दिवसांपूर्वी शेख यांच्याकडे आले होते. काही दिवसमुक्कामी राहिल्यानंतर त्यांनी सोमवारी मध्यरात्री बंगल्यात चोरी केली.

चोरी करण्यासाठी चोरट्यांनी जियाउद्दीन शेख यांची (एमएच १९, ईआर ५५३९) क्रमांकाची दुचाकी वापरली होती. चोरी केल्यानंतर चोरटे पुन्हा जियाउद्दीन शेख यांच्या घरी गेले. त्यांनी दुचाकी त्यांच्याकडे लावून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांना आश्रय देणाऱ्या जियाउद्दीन शेख यांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *