अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस अधीक्षकांचा थेट कारवाईचा बडगा : महसूल विभागाचे मौन संशयास्पद !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी दुपारी स्वतः पुढाकार घेऊन अशा बेकायदा वाळू वाहतुकीवर थेट कारवाई करत प्रशासनाला सजग केले. बुधवारी दुपारी सुमारे दोनच्या […]
मंत्री गडकरी संतापले : समाज माध्यमांवर आणि पत्रकार फक्त माझा फोटो छापतात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील रस्ते बांधकाम आणि त्यातील गुणवत्ता याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात अत्यंत परखड आणि कठोर विधान केले आहे. महामार्गांच्या बांधकामातील निकृष्टतेबद्दल जनतेच्या रोषाला आणि माध्यमांवरील टीकेला (शिव्यांना) फक्त आपल्यालाच का सामोरे जावे लागते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर, त्यांनी आता देशातील […]
भरदुपारच्या सुमारास भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील वडगाव रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर कलिंगड भरलेल्या ट्रकने मोटरसायकलीस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकली वरील २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी अडावद येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अडावद येथील पोलीस स्टेशन समोरील वडगाव रस्त्यावर आज दि. ३० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चंदसनी, कमळगाव, वडगाव येथील शेतातून टरबूज […]
रामदेववाडी जवळ भीषण अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे रामदेववाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे […]
आ.खडसेंच्या बंगल्यावर चोरी प्रकरण : पोलिसांनी चोरट्यांना आश्रय देणाऱ्याला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरी करण्यापूर्वी व नंतर चोरटे मास्टर कॉलनीतील नातेवाइकांकडे थांबले होते. चोरट्यांना आश्रय देणारा नातेवाईक जियाउद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी) याला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी […]
तुम्हाला तुमच्या वडिलांचा पाठिंबा मिळेल. कामात प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होणार !

आजचे राशिभविष्य दि. ३१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज कोणत्याही काम पूर्ण करण्याची घाई करू नका, नाहीतर ते अपूर्ण राहील. विद्यार्थी अभ्यासावर कमी लक्ष केंद्रित करतील आणि मोबाईल फोनवर जास्त लक्ष केंद्रित करतील. आज तुमचे अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवा. वृषभ राशी आजचा दिवस नवीन भेटवस्तू घेऊन येईल. तुम्ही आधीच केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. आज […]