Home » जळगाव » ईच्छा देवी चौकातील दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले !

ईच्छा देवी चौकातील दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले !

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील ईच्छा देवी चौकात असलेल्या अशोका लिकर गॅलरी या मद्य विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकडसह लाखो रुपयांची दारु चोरुन नेली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघउकीस आली आहे. चोरट्यांनी याठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करीत दुकानातील डीव्हीआर चोरुन नेला.

भुसावळ येथील रहिवासी असलेले अशोक नागराणी यांचे जळगावात शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी नावाने मद्य विक्री दुकान आहे. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातून ७० हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे दहा लाख रुपये किंमतीची अंदाजे १२६ बॉक्स देशी विदेशी दारू लंपास केली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी कामगार दुकानावर आले असता, त्यांना दुकाना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ जिल्हापेठ पोलीसांना दिली. चोरट्यांनी चोरी करण्यापुर्वी दुकानाच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर उचकावून ते आत शिरले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुकानात ठेवलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर देखील चोरुन नेला असून त्यामुळे पोलिसांना तपासात अनेक अडचणी येत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *