Home » ताज्या » चोरट्यांचा धुमाकूळ वाढला : एकाच मध्यरात्री दोन ठिकाणी मारला डल्ला !

चोरट्यांचा धुमाकूळ वाढला : एकाच मध्यरात्री दोन ठिकाणी मारला डल्ला !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील न्हावी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या यापैकी एका ठिकाणी दागिने व रोकड असा साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास झाला. दुसऱ्या ठिकाणी २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव नगरमध्ये नारायण कडू नेमाडे यांच्या घरी २५ जून रोजी सकाळी २ वाजून ५१ मिनिटांनी तीन चोरटे घरात शिरले व ९ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख ६५ हजार रुपये रोख असा एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्हीमध्ये चोरटे अस्पष्टपणे आढळून आले आहेत.

याचबरोबर येथील चावदस नगरामध्ये राहुल अरुण चौधरी यांच्या घरामध्ये कोणी नसल्याची संधी साधत चोरांनी दरवाजाचा कडीकोंडा वाकवून घरामध्ये प्रवेश केला व कपाटातील २५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने घेऊन चोर पसार झाले. सकाळी उठल्यानंतर शेजारच्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. फैजपूर पोलिस स्टेशनचे ए. पी. आय रामेश्वर मोताळे व नईम उद्दीन सय्यद तपास करीत आहे. दरम्यान, श्वान पथक बोलावूनही तपासणी केली. मात्र ठोस माग आढळला नाही.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *