September 29, 2026 9:08 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मराठी अन्याय होता कामा नये ; माजी मुख्यमंत्री चव्हाण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील काढणार आहेत. या मुद्द्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले […]

अहमदाबादमध्ये जगन्नाथ यात्रेत डीजेमुळे ३ हत्ती नियंत्रणाबाहेर ; गोंधळात ४ जण जखमी

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये १४८ वी जगन्नाथ रथयात्रा काढली जात आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनियंत्रित हत्ती इकडे तिकडे धावू लागला आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. मात्र, शेवटी, महूतांनी हत्तीला नियंत्रणात आणले. जगन्नाथ यात्रेत हजारो भाविक जमतात. यादरम्यान, तीन हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, गर्दीत उपस्थित असलेले लोक देखील इकडे […]

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आजपासून २४ तास दर्शन सुरू !

पंढरपूर : वृत्तसंस्था आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७) सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, […]

घरात कुणीही नसताना तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी आई वडील कामाला गेलेले होते तर भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेला होता. यावेळी घरात एकटयाच असलेल्या श्रीकांत मोहन धनगर (वय २१, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्टस असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली […]

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणारी टोळी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी ४ वाजता अमरावती जिल्ह्यातील तीन संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, पाच मोबाइल आणि एक कार असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, […]

मध्यरात्री दरोड्याच्या तयारीत असलेली अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

चोपडा : प्रतिनिधी मामलदे शिवारातील चोपडा- चुंचाळे रोडवर बुधवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील सहा अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पथक तयार केले होते. बुधवारी रात्री मामलदे शिवारातील चोपडा-चुंचाळे रोडवर अंधारात निर्जनस्थळी उभी […]

चोरट्यांचा धुमाकूळ वाढला : एकाच मध्यरात्री दोन ठिकाणी मारला डल्ला !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या यापैकी एका ठिकाणी दागिने व रोकड असा साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास झाला. दुसऱ्या ठिकाणी २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव नगरमध्ये नारायण कडू नेमाडे यांच्या घरी २५ जून रोजी सकाळी २ वाजून ५१ मिनिटांनी तीन चोरटे घरात शिरले व ९ […]

कठोर परिश्रमानंतर व्यवसाय चांगला चालणार !

आजचे राशीभविष्य दि.२७ जून २०२५ मेष : मेष राशीचे लोक नशीब आणि धर्म इत्यादींवर लक्ष केंद्रित करतील. उपजीविकेच्या क्षेत्रातही मोठा बदल दिसून येईल. दुपारनंतर तुमची लोकप्रियता शिगेला पोहोचेल. वृषभ: वृषभ राशीचे लोक खर्च इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतील. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला थंडी वाजून आजार, ताप इत्यादींचा त्रास होईल. अन्नातील अनियमितता टाळावी. मिथुन: मिथुन […]

error: Content is protected !!