Home » जळगाव » तृतीयपंथीय व्यक्तीला खंडणीसाठी धमकी ; गुन्हा दाखल !

तृतीयपंथीय व्यक्तीला खंडणीसाठी धमकी ; गुन्हा दाखल !

भुसावळ : प्रतिनिधी

खडका रोड, सत्यसाई नगर, भुसावळ येथील अशपाक उर्फ अम्रपाली जाबीर बागवान (वय ३२) या तृतीयपंथीय व्यक्तीला काही ओळखीच्या तृतीयपंथीयांनी आणि एका पुरुषाने मिळून जिवे मारण्याची तसेच दररोज हफ्ता न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, ही घटना ४ जून रोजी रात्री ११.३० वाजता अम्रपाली यांच्या राहत्या घरी घडली. अम्रपाली बागवान या जोगवा मागून आणि किरकोळ काम करून आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करत असताना, विजय सोनर, भावेश उर्फ भावना, अश्विनी उर्फ आशु श्रावण बाविस्कर, राजेश उर्फ राखी तुळशीराम सूर्यवंशी, आकाश उर्फ रुपाली आणि नितीन उर्फ गोलू संगत हे सहा जण त्यांच्या घरी येऊन त्रास देऊ लागले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिक देखील दहशतीमुळे पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय परेश जाधव करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *