Home » जळगाव » शेतकऱ्याच्या खिशातून पैसे लांबविणारे तिघे अटकेत !

शेतकऱ्याच्या खिशातून पैसे लांबविणारे तिघे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असताना शेतकरी प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये लंपास करणारे तीन खिसेकापु जळगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहेत. गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती व सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दि. 01 डिसेंबर 2025 रोजी यावल येथील शेख कलीम शेख इसाक (वय 50) हे पत्नीचे मेडीसीन घेऊन जळगावहून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या पँटच्या खिशातून १५,००० रुपये काढून नेले. घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात CCTNS क्रमांक 877/2025, कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेऊन पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सीसीटीव्ही फूटेजचे बारकाईने निरीक्षण करून संशयितांची ओळख पटवली आणि रजा कॉलनी परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी : हमीद अय्युब खान (वय 22), रा. अक्सा नगर, समीर खान अफसर खान (वय 22), रा. शेरा चौक, जळगाव,  शोहेब मेहमुद पटेल (वय 23), रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव या अटक आरोपींकडून फिर्यादीचे संपूर्ण १५,००० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

यांनी केली कारवाई 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोहेकॉ गिरीष पाटील, पोना प्रदीप चौधरी व पोकॉ विशाल कोळी यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गिरीष पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *