Home » ताज्या » तीन सुवर्ण पेढ्यांतून अंगठ्या लंपास; ‘त्या’ महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

तीन सुवर्ण पेढ्यांतून अंगठ्या लंपास; ‘त्या’ महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (वय ३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) या लेडी नॅचरला बरेलीतून जेरबंद केले. चोरी करण्याची आयडीया तीला युट्युब, क्राईम पेट्रोल, सावधान इंडियावरील व्हिडीओ बघून मिळाली तर चोरीसाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून तेथे अंगठी बघतांना हातचालाखी लाखी करीत आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या नामांकीत सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या अंगठ्या चोरुन नेल्याची घटना ऑक्टोंबर महिन्यात उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ व शनिपेठ पोलीस ठाण्यात या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच चोरी करतांना ही महिला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांकडून फुटेजच्या आधारावरुन लेडी नॅचरचा शोध शोध घेतला जात होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन ही महिला उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याची माहिती शनिपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासधिकारी पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा आणि पोकों निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली येथून ताब्यात घेतले. अंगठी चोरी करण्याची आयडीया या लेडी स्नॅचरला युट्यूबवरुन मिळाली आणि क्राईम पेट्रोल, सावधान इंडीयायासह क्राईम स्टोरीमधील घटना वाचून ती सुमारे दहा वर्षांपासून तीने वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करीत आहे. नामांकीत सोन्याचे शोरुम शोधण्यासाठी गुगल मॅपचा ती वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

अनेक शोरुममध्ये गेल्यानंतर ही महिला तेथील दागिन्यांना लावलेले क्युआर कोडचे टॅग चोरी करीत होते. तसेच शोरुमच्या बाहेर फेकलेल्या कचऱ्यांमधून तीने दागिन्यांना लावले जाणारे टॅग चोरले आणि ते बनावट अंगठ्यांना लावून हातचालाखी करीत तेथून सोन्याची अंगठ्या चोरुन नेल्याचे त्या महिलेने पोलिसांना सांगितले

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *