Home » जळगाव » तीन तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले !

तीन तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले !

चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरात दोन वेगवेगळ्या घटनात तोतया पोलिसांनी ज्येष्ठांच्या अंगावरील दागिणे काढण्यास भाग पाडून ते घेऊन पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रांखुडेनगर भागात राहत असलेल्या शिक्षक मुलाकडे अमोदे (ता. नांदगाव) येथील लिलाबाई पाटील जात असताना गुरुवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या व हेल्मेट घातलेल्या तिघा भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून पुढे खून झाला आहे. तुमच्या अंगावरील दागिने काढून सुरक्षित ठेवा, असे सांगितले.

यावेळी एका भामट्याने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून दिल्याने महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून सात तोळ्याच्या बांगड्या, दीड तोळ्याचा हार आणि पाच ग्रॅम वजनाची अंगठी असा ऐवज काढून तो तोतयांनी दिलेल्या रूमालात ठेवला आणि तेथून तात्काळ पळ काढला. तोतयांनी हातचलाखी करून ते दागिने काढून घेतले. आजीबाई घरी गेल्या असता रूमालात दागिने नसल्याचे दिसून आले. त्यांनी शहर पोलिस स्टेशनला धाव घेतली व पोलिसांना झाला प्रकार सांगितला. दुसऱ्या घटनेत करगाव रस्त्यावरील पोलिस चौकशी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. के. वाणी यांनादेखील हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पुढे चोर आहेत. तुमच्या हातातील अंगठी काढून ठेवा, अशी बतावणी करून रूमालात अंगठी टाकण्याचे सांगून ती घेऊन पळून गेले. वाणी यांनी घरी जावून रूमाल उघडून पाहिला तर त्यात खडा निघाला. या प्रकारानंतर त्यांनी शहर पोलिस स्टेशनला धाव घेतली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *