Home » जळगाव » दोघां भावांना तिघांनी केली जबर मारहाण !

दोघां भावांना तिघांनी केली जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर दि.२६ जून रोजी घराकडे जात असलेल्या भूषण मोतीलाल पवार (३४) व त्यांचा मोठा भाऊ शरद पवार यांची दुचाकी अडवून जुन्या वादातून तीन जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भूषण पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड करीत आहेत.

जुन्या जोशी कॉलनीतील रहिवासी भूषण पवार व त्यांचा भाऊ शरद पवार हे दुचाकीने घरी जात होते. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर तीन जणांनी जुन्या वादातून दुचाकी अडविली व शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *