Home » जळगाव » वृद्धेच्या घरातून चोरले तीन तेलाचे डब्बे !

वृद्धेच्या घरातून चोरले तीन तेलाचे डब्बे !

जळगाव ; प्रतिनिधी

वृद्ध महिला गावाला गेलेली असतांना त्यांच्या घरात ठेवलेले १५ किलो वजनाचे ६ हजार ७५० रुपये किमतीचे तीन तेलाचे डबे चोरुन नेले. ही घटना दि. १७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास मारुतीपेठ परिसरात घडली. याप्रकरणी संशयित मिहीर प्रल्हाद बिडे रा. तेली चौक, जुने जळगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जूने जळगावातील मारुतीपेठेतील वीर जवान मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी वणी गडावर दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीसाठी अनेक जण दान, वर्गणी म्हणून वेगवेगळ्या वस्तू देत असतात. हे मंडळ दिंडीहून परतल्यानंतर वाद्य वाजविणाऱ्यास देण्यासाठी पैसे नसल्याने मंडळाच्या अध्यक्षांनी या परिसरातील कमल भागवत काळे (वय ७६) यांना मंडळाकडे दान स्वरुपात आलेले तेलाचे डबे विकत घेण्याविषयी विचारले. त्यानुसार सदर वृद्धेने प्रत्येकी १५ किलो वजनाचे ६ हजार ७५० रुपयांचे तीन तेलाचे डबे घेतले.

वृद्ध महिला या गावाला गेल्यानंतर त्यांच्या घरातून तेलाचे हे डबे चोरट्याने चोरून नेले. गावाहून परतल्यानंतर दि. १७ रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर याप्रकरणी वृद्धेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात संशयित महिर प्रल्हाद बिडे या तरुणावर संशय व्यक्त केला आहे. त्यावरून संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *