Home » जळगाव » जुन्या वादातून तिघांना जबर मारहाण !

जुन्या वादातून तिघांना जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी

जून्या वादातून शरिफ इमान खान (वय ४६, रा. शाहूनगर) यांच्यासह त्यांचा जावई व भावजाईला लाकडी दांडक्यासह दगडविटांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २८ रोजी शाहूनगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहून नगरातील पडकी शाळेमागे शरिफ खान हे वास्तव्यास आहे. दि. २८ रोजी जुन्या वादातून संशयित सल्या उर्फ सलाउद्दीन कुतूबौद्दीन शेख, करीम मुस्तकीन खान, इमरान मुश्ताक खान उर्फ मुल्ला यांनी शरिफ खान यांचा जावई इमरान हुसेन भिस्ती यास दगड विटांनी मारहाण केली. यावेळी शरिफ खान व त्यांची भावजाई हे त्याला वाचविण्यासाठी आले असता, त्यांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *