Home » जळगाव » तिकीट चेकरने रेल्वे स्थानकावर संपविली जीवनयात्रा !

तिकीट चेकरने रेल्वे स्थानकावर संपविली जीवनयात्रा !

भुसावळ : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट चेकरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३१ मार्चला रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे अकोलासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुमेध मेश्राम (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या तिकीट चेकरचे नाव आहे. त्यांनी मालगाडीसमोर उडी घेत आले आयुष्य संपवले.

सविस्तर वृत्त असे कि, सुमेध मेश्राम हे घरगुती तणावातून ग्रस्त होते. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास मुर्तिजापूर स्थानकावर कर्तव्य बजावत असताना त्यांनी अचानक भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीसमोर उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सुमेध मेश्राम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, घरगुती तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि रेल्वे प्रशासनात शोककळा पसरली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *