भुसावळ : प्रतिनिधी
चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये लोको पायलटकडून तिकीट निरीक्षकाच मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी २४ मार्च रोजी भुसावळ रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक संघटनेच्या वतीने काळ्याफिती निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान मारहाण करणाऱ्या लोको पायलट विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई आमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मध्ये लोको पायलट कडून तिकीट निरीक्षकास मारहाण केली तिकीट निरीक्षकाने सीट उपलब्ध न करून दिल्याच्या रागातून लोको पायलेट ने तिकीट निरीक्षकास मारहाण केल्याचा आरोप केला. मारहाणीत तिकीट निरीक्षकास दुखापत झाली असून तिकीट निरीक्षकास बडनेरा येथे रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. तिकीट निरीक्षकास मारहाणीच्या निषेधार्थ भुसावळ रेल्वे मंडळातील तिकीट निरीक्षकांनी काळ्या फिती लावून काम करत घटनेचा निषेध केला. मारहाण करणाऱ्या लोको पायलट वर रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची तिकीट निरीक्षक संघटनेची मागणी केली आहे.



