Home » जळगाव » अमळनेर » नालखेड्यात दुःखद घटना : लग्नातील नृत्यादरम्यान तरुणाचा मृत्यू; गावात हळहळ

नालखेड्यात दुःखद घटना : लग्नातील नृत्यादरम्यान तरुणाचा मृत्यू; गावात हळहळ

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील नालखेडा गावात आनंदाचा सोहळा क्षणात दुःखाच्या छायेत बदलल्याची घटना घडली. लग्नात नाचताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. या अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथून सध्या अमळनेर तालुक्यातील नालखेडा येथे वास्तव्यास असलेल्या अतुल ज्ञानेश्वर कोळी (वय २५) हा तरुण आपल्या नातलगाच्या लग्नात आनंदाने नृत्य करत होता. नृत्य करत असताना अचानक अतुल कोळी हा खाली कोसळला. उपस्थितांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. यामुळे क्षणातच आनंदात विर्जन पडले व जल्लोष थांबला. अतुल कोळी यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील तो एकुलता एक मुलगा असून आई- वडिलांचा आधार होता. या दुर्दैवी घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर अतुल कोळी यांच्या निधनाने नालखेडा, जांभोरा गावात शोककळा पसरली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *