विद्यार्थ्यांचा एसटी प्रवास सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासाचा प्रश्न गंभीर बनत असताना, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच संपूर्ण राज्यभर विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष ‘विद्यार्थी हेल्पलाईन’ सुरू करण्यात येणार असून शाळेत जाण्या–येण्याच्या प्रवासात उद्भवणाऱ्या अडचणींवर तात्काळ मदत मिळणार आहे. धाराशिव बसस्थानकातील भेटीदरम्यान […]
नालखेड्यात दुःखद घटना : लग्नातील नृत्यादरम्यान तरुणाचा मृत्यू; गावात हळहळ

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नालखेडा गावात आनंदाचा सोहळा क्षणात दुःखाच्या छायेत बदलल्याची घटना घडली. लग्नात नाचताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. या अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथून सध्या अमळनेर तालुक्यातील नालखेडा येथे वास्तव्यास असलेल्या अतुल ज्ञानेश्वर कोळी (वय […]
भाजपला आजही धमक्या का द्याव्या लागतात? सुप्रिया सुळे यांचा घणाघात !

नागपूर : वृत्तसंस्था कधीकाळी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवणारा भाजप पक्षच आज त्याच मार्गावर निघाला आहे. भाजपचे ‘काँग्रेसिकरण’ झाले आहे, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. मोठा जनाधार आणि ‘५१ टक्के मतांची खात्री’ असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला आजही धमक्या का द्याव्या लागतात? या सुसंस्कृत […]
गावठी कट्ट्यांचे हब उघडकीस; ३६ जण ताब्यात, ५० कारखाने जमीनदोस्त : उमर्टीत मोठी कारवाई !

पुणे : वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील उमर्टी गावात पुणे पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय अवैध शस्त्रपुरवठा करणाऱ्या तब्बल ५० कारखान्यांचा भांडाफोड केला. गत काही दिवसांत गुन्हेगारांकडून जप्त झालेल्या शस्त्रांवर ‘यूएसए’ असा शिक्का दिसून आल्यानंतर तपासाची दिशा बदलली. ‘यूएसए’ म्हणजे ‘मेक इन यूएसए’ नव्हे, तर ‘उमर्टी शिकलगार आर्म्स’ असा उलगडा झाला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी तीन […]
जळगाव बोगस कॉल सेंटर रॅकेटचा उलगडा; मुंबईतील ‘हँडलर’ दोघे अटक !

जळगाव : प्रतिनिधी मुंबई येथून जळगावातील अटक बोगस कॉल सेंटर हाताळणारे आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांना मुंबई येथून करण्यात आली आहे. दोघांच्या अटकेमुळे फसवणुकीची रक्कम कोणाच्या खात्यावर आली यासह अनेक बाबींचा उलगडा होऊन आंतरराष्ट्रीय रॅकेटही उघड […]
शेतजमीन विक्रीचे आमिष : जळगावातील एकाची सात लाखात फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील शेतजमीन विक्रीच्या आमिषाने शिवाजीनगरातील भगवान काशिनाथ सोनवणे (४२) यांची ७ लाख ७४ हजार ७८६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी राजपूत नाव सांगणाऱ्या महिलेসহ असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार) आणि प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) अशा चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. […]
जामनेर : देवदर्शनाला जाताना भीषण अपघातात चुलत भाऊ ठार !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील दोन भाऊ शिरसाळा येथे दर्शनासाठी जात असताना चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१, दोघे रा. पाळधी ता. जामनेर) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे […]
आज तुम्ही व्यवसायानिमित्त परदेशात प्रवास करू शकता.

आजचे राशिभविष्य दि.२३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी तुम्ही तुमच्या करिअरसाठी नवीन योजना बनवाल. तुम्ही तुमच्या गुरूकडून करिअर सल्ला घेऊ शकता. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. विवाहीत जोडप्याल गुड न्यूज मिळेल. वृषभ राशी आज तुम्ही व्यवसायानिमित्त परदेशात प्रवास करू शकता. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळू शकते. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने घरातील वातावरण […]