Home » जळगाव » दुर्देवी : इंजेक्शन दिल्यानंतर तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

दुर्देवी : इंजेक्शन दिल्यानंतर तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

उपचारासाठी दाखल असलेलया बाळाला महागडे इंजेक्शन दिले. मात्र त्यानंतर बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविले. परंतु येथे उपचार सुरु असतांना बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यापुर्वी देखील या रुग्णालयात दोन दिवसांपुर्वी एक बाळ दगावल्यामुळे या हॉस्पिटलची चौकशी करावी, अशी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

भुसावळ येथील अमोल राजू धाळे यांचा तीन वर्षाचा मुलगा हर्षल याच्यावर शहरातील एका खासगी हॉस्पिटल येथे आठ महिन्यांपासून उपचार सुरु होते. त्यांच्याकडे पुणे येथील डॉक्टर तपासणी करीता येत असल्याने त्यांनी धाळे यांच्या बाळाला ठिक करतील असे सांगितले होते. याठिकाणी मुलावर उपचार सुरु असतांना त्यांनी चिमुकल्याला महागडे इंजेक्शन दिले. मात्र त्यानंतर बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला व्हेंटिलेटर लावावे लागेल असे म्हणत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू याठिकाणी बाळाचा उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचार सुरु असलेल्या ठिकाणी यापुर्वी देखील आणखी एका बाळाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा आरोप अमोल धाळे यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी मृत बालकाचे वडील अमोल धाळे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *