Home » जळगाव » धारदार कोयता घेवून दहशत माजविणारे दोघे अटकेत !

धारदार कोयता घेवून दहशत माजविणारे दोघे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

हातात धारदार पाते असलेला लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या उमेश भगवान जाधव (वय ३३, रा. अयोध्या नगर) व गणेश भगवान लोहार (वय २७, रा. अयोध्यानगर) या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अजिंठा चौफुली परिसरात उमेश भगवान जाधव व गणेश भगवान लोहार हे दोघ हातात धारदार कोयता घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी प थकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोघांवर कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला असून पोलीस कर्मचारी शादाब अख्तर ईक्बाल सैय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *