स्वतःवर गोळी झाडून संपविली जीवनयात्रा !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील नमस्कार एका ५२ वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावठी कट्टा त्यांच्या हातात कुठून आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डिगंबर बढे हे भुसावळमधील एका […]
राज्यातील हिंदू शेरनीला पाकिस्तानातून धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमकीचा काॅल आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है’, अशा पद्धतीच्या नवनीत राणा यांना धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत […]
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. जवळपास हजार रुपयांपर्यंत कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे समजते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी […]
लोकशाहीचा आत्मा हरवतोय ; माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता !

पुणे: वृत्तसंस्था लोकशाही व्यवस्थेत सध्या आपण संक्रमणाच्या काळातून जात आहोत. अनेक आव्हाने समोर आहेत. लोकशाही वाचवण्याची गरज आहे, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकशाहीचा आत्मा हरवत चालला आहे, अशी स्पष्ट चिंता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच शिमला करारात स्पष्ट आहे की भारत-पाकिस्तानच्या संबंधात कोणतीही तृतीय मध्यस्थी होणार नसल्याची तरतूद असल्याचेही चव्हाण म्हणाले. पुणे […]
सराफा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले मात्र चोरीचा प्रयत्न फसला !

यावल : प्रतिनिधी शहरातील मेन रोडावर चावडीच्या पुढे असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले. मात्र, आत देखील चैनल गेट असल्याने चोरीचा हा त्यांचा प्रयत्न फसला. दरम्यान तेथून पुढे याच भागातील एका कुलूप बंद घराला देखील त्यांनी लक्ष केले. घराचे कुलूप तोडले मात्र घरात काहीच नव्हते. तर यापूर्वी […]
धारदार कोयता घेवून दहशत माजविणारे दोघे अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी हातात धारदार पाते असलेला लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या उमेश भगवान जाधव (वय ३३, रा. अयोध्या नगर) व गणेश भगवान लोहार (वय २७, रा. अयोध्यानगर) या दोघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अजिंठा चौफुली परिसरात उमेश भगवान […]
२२ वर्षीय कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मुक्ताईनगर : प्रतिनिधी महावितरणमधील कंत्राटी कामगार नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना ११ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रुईखेडा गावात घडली. नितेश हा कंत्राटदारामार्फत पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत प्रवाह सुरू झाला आणि त्याला जोरदार झटका बसला. यामुळे तो पोलवरून खाली कोसळला. त्याला मुक्ताईनगर उपजिल्हा […]
आज काही महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर चर्चा होणार !

आजचे राशिभविष्य दि.१२ मे २०२५ मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आज तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. अनुकूल काळाचा योग्य उपयोग करा. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. भविष्यातील काही महत्त्वाच्या योजनांचे नियोजन कराल. मालमत्ता किंवा वारसाहक्काशी संबंधित काही कामांमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध बिघडणार नाहीत याची […]