Home » जळगाव » पारोळ्यानजीक दोन दुचाकीची जबर धडक : चौघे गंभीर जखमी !

पारोळ्यानजीक दोन दुचाकीची जबर धडक : चौघे गंभीर जखमी !

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील जोगलखेडे शिवारात रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ४ जण जखमी झालेत. तर जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिका परत येत असताना मेहू-टेहू गावाजवळ अचानक शॉर्टसर्किट होऊन गाडीला आग लागल्याने ती ही जळून खाक झाली. सुदैवाने गाडीत रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त असे कि, पारोळा ते चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या जोगलखेडे शिवारात २ दुचाकींची २७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात नंदुरबार जिल्ह्यातील वेलखेडी येथील विमल सुकल्या वसावे,  शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील रोहन विश्राम पावरा तर पारोळा तालुक्यातील आडगाव तांडा येथील मनीषा जितेंद्र राठोड व जितेंद्र राठोड हे चारही जण जखमी झालेत. दरम्यान, जखमींना घेण्यासाठी दोन रुग्णवाहिका गेल्या होत्या. यात नरेंद्रचार्य महाराज यांच्या संस्थानाच्या रुग्णवाहिकेत चौघाही जखमींना बसवण्यात आले.

त्यानंतर त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर घटनास्थळी रुग्ण नसल्याने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका परतीच्या प्रवासाला लागली. दरम्यान, मेहू टेहू गावाजवळ रुग्णवाहिकेत अचानक शॉर्टसर्किट होऊन धूर निघायला सुरुवात झाली. त्यानंतर चालक रोशन पाटील यांनी लगेच गाडी उभी करून उडी मारली. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. तर पारोळा नगरपालिकेच्या अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक कर्मचारी मनोज पाटील यांनी ही आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत ही रुग्णवाहिका संपूर्ण जळून खाक झाली. या वेळी डॉ. सुनील पारोचे यांच्यासह १०८ वरील इतर रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पहिल्या रुग्णवाहिकेतून रुग्ण आल्याने तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *