Home » जळगाव » चाळीसगाव » दोन मुलीनी प्रवाशाची बॅग कापून २ लाखांचे दागिने लांबविले !

दोन मुलीनी प्रवाशाची बॅग कापून २ लाखांचे दागिने लांबविले !

चाळीसगाव : प्रतिनिधी

धुळ्याकडून चाळीसगावकडे येताना बसमध्ये दोन अज्ञात मुलींनी प्रवाशाची बॅग एका बाजुने कापून बॅगेतून सुमारे २ लाख १५ हजाराचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा ऐवज लांबवल्याची घटना नुकतीच घडली.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील पातोंडा येथील पंडित नरहर वाणी (वय ८०) हे सेवानिवृत्त शिक्षक पत्नी, मुली व जावयासह धुळ्याहून चाळीसगावकडे येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले. तर वाणी यांच्याजवळील बॅगेत सोन्याच्या दोन पोत व रोख ५ हजार रूपये असा ऐवज ठेवलेला होता. त्यांनी ही बॅग पायाजवळ ठेवली व प्रवासात त्यांना झोप लागली. दरम्यान, बसमध्ये गर्दी असल्याने त्यांच्या पायाजवळच दोन मुली बसलेल्या होत्या. तर धुळे रोडवरील महाविद्यालयाजवळ या दोन मुली बसमधून उतरल्या. त्यानंतर वाणी हे बस स्थानकात उतरून मुलीच्या शास्त्री नगरमधील घरी गेले. तेथे पत्नीला डायबीटीजची गोळी काढण्यासाठी बॅग उघडली असता बॅग एका बाजुने त्यांना कापलेली दिसली. तर बॅगेत ठेवलेली सोन्याच्या पोत व पैसे दिसले नाहीत.

दरम्यान, बसमध्ये पंडित वाणी हे बसलेल्या मुली चाळीसगाव महाविद्यालयाजवळ बसमधून उतरलेल्या होत्या. या दोघांनीच बॅगमधील ९० हजारांची सोन्याची ३ तोळ्यांची मंगलपोत व १ लाख २० हजारांची ४ तोळ्याची मंगलपोत तसेच ५ हजार रूपये रोख असा २ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची फिर्यादी पंडीत वाणी यांनी दिली आहे. हा चोरीचा प्रकार ९ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मोठ्या कॉलेजजवळ घडला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात १८ जूनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *