Home » जळगाव » अमळनेर » दोन गट भिडले ; एकमेकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल !

दोन गट भिडले ; एकमेकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल !

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील शाहआलम नगरमध्ये दि. २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पूर्वीच्या वादावरून दोन गटात वाद होऊन दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना  घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पहिल्या गटाच्या महिलेने फिर्याद दाखल केली की, दि २८ रोजी ती बाजारातून घरी परत येत असताना शाहआलमनगर पाटीजवळ फारुख शेख मजिद, रफीक शेख मजिद समोर आले आणि त्यांनी महिलेला शिवीगाळ करून तेरे पती को केस वापस लेने लगा, नही तो जहा मिलेगे वहा मारेंगे असा दम दिला. आणि तिचा दुपट्टा ओढून धक्काबुक्की केली. तिचा पती आल्यावर ती तक्रार दाखल करायला जात असताना पाऊस पडला म्हणून तिने दि २९ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ७४, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटातर्फे महिलेने फिर्याद दिली की, ती दि २८ रोजी सायंकाळी ५ वाजता तिची जेठाणी व काही महिलांसोबत साखरपुड्यात जेवण करून येत असताना समशोद्दीन शाह रज्जाक शाह, अन्सार शाह रज्जाक शाह तिघे मोटरसायकलवर आले. आणि समशोद्दीनने गालावर हात फिरवून अश्लील शब्दात छेडखानी केली. साबीरने ओढणी ओढली. ती महिला घरी निघून गेली. ती देखील पावसामुळे पोलिसात फिर्याद द्यायला गेली नाही. दुसऱ्या दिवशी तिने फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज हे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *