Home » जळगाव » अमळनेर » अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील दोघे सराईत गुन्हेगार हद्दपार

अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील दोघे सराईत गुन्हेगार हद्दपार

अमळनेर : प्रतिनिधी

अमळनेर येथील मोज्जम शेख शब्बीर याला एक वर्ष आणि अडावद, ता. चोपडा येथील संजय रवींद्र इंगळे याला तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले असल्याची प्रांताधिकारी माहिती नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गाअली भागातील मोज्जम शेख शब्बीर याच्यावर चोरी, घरफोडी, मालमत्ता नुकसान, मारहाण यासारखे गुन्हे आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मोज्जम विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपअधीक्षक विनायक कोते यांच्याकडे पाठवला.

त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मुंबई पोलिस अधिनियमाप्रमाणे मोज्जम याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. अडावद, ता. चोपडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंप्री येथील संजय रवींद्र इंगळे याच्यावर देखील विनयभंग, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सुनावणी होऊन मुंडावरे यांनी संजय इंगळे चोपडा, यावल, रावेर, धरणगाव, अमळनेर या पाच तालुक्यांतून तीन महिन्यांकरिता हद्दपार केले आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *