यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डांभुर्णी गावातील बस स्थानकावर काहीच कारण नसताना एका ४० वर्षीय प्रौढाला गावातील दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, डांभुर्णी येथील रहिवासी सुधाकर रघुनाथ कोळी (वय ४०) हे बस स्थानकावर गेले होते. तेथे भूषण सुभाष कोळी व तेजस उर्फ आमप्या सुनील कोळी यांनी त्यांच्याशी कारण नसताना वाद घातला आणि त्यांना शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. यात सुधाकर कोळी यांच्या पाठीवर, डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भूषण कोळी व तेजस कोळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



