September 24, 2026 11:01 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

खळबळजनक : दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असताना आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे तर एकीची प्रकृती गंभीर आहे. भाग्यश्री म्हेत्रे (वय १६), जिया महादेव म्हेत्रे ( वय १६) अशी मृत मुलींची नावे आहेत. सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये ही […]

जन्म-मृत्यू नोंदणी गैरव्यवहार, अखेर ४३ जणांवर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. तब्बल 43 जणांनी तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून बनावट जन्म-मृत्यू दाखले मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार नवीनचंद अशोक भावसार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये 43 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने […]

राज ठाकरेंचे पत्र व्हायरल अन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलनाला ब्रेक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आणल्यानंतर राज्यातील मनसैनिक आक्रमक केले असतांना आता हे आंदोलन अखेर थांबवणार आहे. या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आपण पुरेशी जागृती केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच राज ठाकरे […]

ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे ६१ व्या वर्षी निधन !

मुंबई : वृत्तसंस्था दि.४ एप्रिल रोजी संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असतानाच मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक […]

तरुणाच्या डोक्यात तिघांनी मारला फावडा!

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडनगरी येथे तरूणाला दारूच्या नशेत येवून तीन जणांनी शिवीगाळ करत डोक्यावर फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]

२९ वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक कृत्य !

यावल : प्रतिनिधी येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक कृत्य तर सासरे आणि नंदोईने अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलिसांत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरे, नंदोई यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय पीडित विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, त्यांचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत […]

शिवीगाळ करीत प्रौढाला दोघांनी केली जबर मारहाण !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डांभुर्णी गावातील बस स्थानकावर काहीच कारण नसताना एका ४० वर्षीय प्रौढाला गावातील दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करत गंभीर जखमी केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, डांभुर्णी येथील रहिवासी सुधाकर रघुनाथ कोळी (वय ४०) हे बस स्थानकावर गेले होते. तेथे भूषण सुभाष कोळी व […]

जिल्हा परिषदेत खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला आणि दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास लाच घेतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागातील काहींची चौकशी करण्यात आली असल्याचे […]

अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडणार !

आजचे राशिभविष्य दि.५ एप्रिल २०२५ मेष श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीमुळे काही काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवता येतील. तुम्ही तुमच्या कामांवर नवीन उर्जेने लक्ष केंद्रित करू शकाल. कोर्ट केस सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. शेजारी किंवा बाहेरील व्यक्तीशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो याची जाणीव ठेवा. तुमच्या कामावर […]

error: Content is protected !!