Home » राज्य » शिर्डीत दोन खुनाच्या घटना सीसीटीव्हीत कैद !

शिर्डीत दोन खुनाच्या घटना सीसीटीव्हीत कैद !

शिर्डी : वृत्तसंस्था

साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भाजपचे या भागातील नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं. स्वत: घटनास्थळी जाऊन पाहाणी केली.

तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याच्या या घटना घडल्या आहेत. चारच्या सुमारास घटना घडल्याने फार लोक जागे नव्हते. दोन बॉडीज वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्या. तिस-यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डीत एकाचदिवसात पहाटेच्यावेळी तीन वेगवेगळ्या चाकू हल्ल्याच्या घटना होणं ही गंभीर बाब आहे. या घटनेमुळे शिर्डीत प्रचंड संताप आहे. स्थानिकांनी आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ते शिर्डी साई संस्थानमध्ये नोकरीला होते. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ साकुरी शिवचे रहिवासी आहेत. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव कृष्णा देहरकर असून त्याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला. हत्याकांडाला अपघात म्हटल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. पोलिसांनी कारवाईत तत्परता दाखवली नाही असं स्थानिकांच म्हणणं आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात. शिर्डीमध्ये नेहमी भक्तांची गजबज असते. त्या भागात अशा प्रकारे हत्या होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे.

 

 

 

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *