Home » जळगाव » दोन ट्रक समोरासमोर धडकल्या : दोन ठार तर एक गंभीर !

दोन ट्रक समोरासमोर धडकल्या : दोन ठार तर एक गंभीर !

जळगाव : प्रतिनिधी

शहराबाहेरून जाणाऱ्या पाळधी ते तरसोद बायपास महामार्गाचे उद्घाटन होण्यापूर्वीच दोन ट्रक समोरासमोर धडकून अपघात झाला. या घटनेत एस. के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) हा चालक तर दुसऱ्या ट्रकचा चालक असे दोन जण ठार झाले. तर १ जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (२७ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास कचरा फॅक्टरीसमोर बायपासवर झाला.

गुजरातमधील मोरबी येथून खाकीनाडा (आंध्र प्रदेश) येथे टाईल्स घेऊन जाणारा ट्रक (क्र. एपी ३९, युएफ ३५९९) बायपासवरून जात असताना समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. जी.जे. १६, एवाय ००७८) ओव्हरटेकच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा होऊन त्या एकमेकांमध्ये अडकल्या.टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली हा ठार झाला. तर या ट्रकचा क्लिनर एस. के. जानी याने कॅबिनमधून उडी घेतल्याने त्याला काहीही दुखापत झाली नाही बायपासचे उद्घाटन होणे बाकी आहे. त्यापूर्वी चाचणी म्हणून एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. यात दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू असताना हा अपघात झाला. घटनास्थळी तालुका पोलिसांनी जाऊन बचावकार्य करण्यासह वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली.

धडक देणाऱ्या ट्रकमध्ये कोळसा होता. धडकेनंतर त्यातील कोळसा समोरील ट्रकवर जाऊन पसरला होता. शिवाय ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने दोन्ही ट्रकचे चालक व एका ट्रकच्या क्लिनरला काढण्यासाठी दोन ते अडीच तास लागले. ट्रकमधील कोळसा जेसीबीच्या सहाय्याने उपसण्यात आला व त्यानंतर ट्रक मागे ओढून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एक गंभीर आहे. टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक एस. के. मौलाली हा ठार झाला

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *