Home » जळगाव » भुसावळात दुचाकी चोरीच्या गँगचा पर्दाफाश, ३ दुचाकींसह आरोपी जेरबंद

भुसावळात दुचाकी चोरीच्या गँगचा पर्दाफाश, ३ दुचाकींसह आरोपी जेरबंद

भुसावळ  : प्रतिनिधी

शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन बँच (डी.बी.) पथकाने केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणात ३ दुचाकींसह बऱ्हाणपूर येथील एक आरोपी जेरबंद करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, भुसावळमधील पांडुरंगनाथ नगरातील सुनील पांडुरंग इंगळे यांनी आपल्या रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच-१९, ईडी-७६५०) चोरीला गेल्याची तक्रार भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून महत्त्वाची माहिती मिळाली की, चोरीचा आरोपी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात आहे. यानुसार, डी.बी. पथकाने तातडीने कारवाई करून बऱ्हाणपूर येथील अरशद खान अहमद खान (वय २२, रा. खाजा नगर, आझाद नगर) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशी करत असतानाच, आरोपीने एक विधीसंघर्षित साथीदारासोबत मिळून भुसावळ परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ३ दुचाकी हस्तगत केल्या. यात १ लाख २५ हजार रुपये किंमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच-१९, ईडी-७६५०), ५० हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटिना (एमएच-१९, डीएस-३७२२) आणि ५० हजार रुपये किंमतीची बजाज सी.टी. १०० ही विना क्रमांकाची गाडी जप्त करण्यात आली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीस गेलेल्या २ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

या यशस्वी ऑपरेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उ पविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने अविस्मरणीय कार्यगती केली. तपासामध्ये स.पो.नि. नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धनगर, रवींद्र भावसार, सुनील सोनवणे, सचिन चौधरी, हर्षल महाजन, जिवन कापडे, महेंद्र पाटील, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी आणि योगेश महाजन यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. या घटनेने भुसावळ शहरातील नागरिकांच्या मनातील असुरक्षिततेचा अनुभव कमी केला आहे आणि पोलिसांच्या तपास पथकाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केलं जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *