Home » जळगाव » दुचाकीच्या चोऱ्या वाढल्या : एमआयडीसी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या !

दुचाकीच्या चोऱ्या वाढल्या : एमआयडीसी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी एका मोटार सायकल चोराला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास एका व्यक्तीने आपली दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीआर.८५३८ ही एचडीएफसी बँकेसमोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, स.फौ. विजयसिंग पाटील, पो.ना. प्रदीप चौधरी आणि पोकॉ विशाल कोळी अशांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते.

पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी पो.ना.प्रदीप चौधरी आणि पोकॉ विशाल कोळी यांना रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. अधिक तपास केला असता, ती मोटार सायकल अनुराग जाधव (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी अनुराग जाधवला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मिळाला. याच काळात पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना.प्रदीप चौधरी करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *