Home » जळगाव » अमळनेर » दुचाकी चोरटे गजाआड; अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

दुचाकी चोरटे गजाआड; अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

अमळनेर : प्रतिनिधी

सीसीटीव्ही आणि डम डेटाच्या आधारे दुचाकी चोरणारे दोन आरोपी अमळनेर पोलिसांनी निष्पन्न केले असून धुळ्याच्या अरबाज शेख साजिद मणियार (२८) याला अटक केली आहे तर अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क कार्यरत ठेवले असून फुटेज तपासणी केल्यावर त्यांना एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा तरुण एका मोटरसायकलवर येताना दिसले आणि अल्पवयीन मुलाने उतरून मोटरसायकल चोरल्याचे दिसले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील विनोद सोनवणे, गौरव पाटील, मिलिंद जाधव यांना आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले. अल्पवयीन मुलाकडे विचारपूस केली असता त्याने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आणि अरबाज याने एक दुचाकी चोरल्याचे सांगितले.

पथकाने अरबाज याचा शोध घेऊन त्याला अटक केली. तिन्ही दुचाकी त्यांनी धुळे शहरात लपवल्याचे सांगताच पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तिन्ही मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींकडून आणखी काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *