September 22, 2026 1:12 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

टीव्हीची केबल काढली, मोबाईल फ्लाइट मोडवर; अजित पवारांच्या आईला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न

बारामती : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील फार्महाऊसवरून समोर आलेली माहिती मनाला चटका लावणारी ठरत आहे. फार्महाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी अजित पवारांच्या आईंशी संबंधित हृदयद्रावक प्रसंग उघड केला आहे. संपत […]

अखेरच्या क्षणापर्यंत कामातच व्यस्त; अजित पवारांचा शेवटचा कार्यदिवस उघड

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कणखर, कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटे आधीच भीषण अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. या दुर्दैवी […]

एरंडोलमध्ये तलाठ्यांचा लाचखोर चेहरा उघड : ३० हजार घेताना दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उघडकीस आणला आहे. नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने राबविलेल्या सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ दाखल करण्यात आला असून […]

अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेले ते चार कोण? एका अपघाताने पाच कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त

बारामती : वृत्तसंस्था बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांचे सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कापूक आणि सह-पायलट शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण […]

अजित पवार गेले… महाराष्ट्र पोरका झाला ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे, राज्याच्या कानाकोपऱ्याची सखोल जाण असलेले लोकनेते आज काळाच्या पडद्याआड गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले की, “अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. जनसामान्यांमध्ये […]

आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस : संजय राऊतांची अजित पवारांना भावूक श्रद्धांजली !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा आघात झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत भावूक शब्दांत शोक व्यक्त करत, “आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. अजित पवारांसारखा कार्यक्षम, रोखठोक आणि दिलखुलास नेता आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ‘बेचव’ व ‘आळणी’ होईल,” असे […]

दुचाकी चोरटे गजाआड; अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

अमळनेर : प्रतिनिधी सीसीटीव्ही आणि डम डेटाच्या आधारे दुचाकी चोरणारे दोन आरोपी अमळनेर पोलिसांनी निष्पन्न केले असून धुळ्याच्या अरबाज शेख साजिद मणियार (२८) याला अटक केली आहे तर अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क कार्यरत ठेवले असून फुटेज तपासणी केल्यावर […]

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना पाचोऱ्यात तलाठ्यावर हल्ला; वाळूमाफियांचा मुजोरपणा उघड

जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना वाळू माफियांनी थेट तलाठ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करून आणत असताना वाळू माफियांनी पाचोरा येथील तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर (वय २५) यांना मारहाण करत ट्रॅक्टर पकडल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाचोरा […]

राज्य हादरलं! बारामतीत विमान कोसळलं, अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला आहे, अशी DGCA (नागरिक विमान वाहतूक महानिदेशालय) कडून अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्र्यांसह विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्रथमच अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाने लँडिंग करताना […]

बारामती विमानतळावर थरार : लँडिंगवेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी […]

error: Content is protected !!