Home » जळगाव » जळगावात दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

जळगावात दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतीनिशी

शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये राहत्या घरामध्ये गळफास घेऊन दोन तरुणांनी आत्महत्या केली. या घटना दि. २८ ऑगस्ट रोजी तांबापुरा व खेडी परिसरात घडल्या. यामध्ये कनवरलाल मांगीलाल चव्हाण (वय ३५, रा. तांबापुरा) व पंकज जगन सपकाळे (वय ३०, रा. खेडी, ता. जळगाव) असे मयत तरुणांचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी परिसरातील पंकज सपकाळे या तरुणाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती स्थापना केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या तरुणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळाने त्याचा भाऊ हा वरच्या खोलीत गेला असता ही घटना त्याच्या लक्षात आली. त्यावेळी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. शहरातील तांबापुरा परिसरातील कनवरलाल चव्हाण या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या बहिणीच्या लक्षात आला. त्या वेळी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या दोन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश वंजारी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *