जळगाव : प्रतिनिधी
तू भाई झाला का, पोलीस स्टेशनला का आला होता असे म्हणत राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६, रा. रायपूर, ता. जळगाव) याला दोघांनी रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील रायपूर येथील राजकिरण परदेशी हे दि. १ रोजी सायंकाळी कामाला जात होते. यावेळी एमआयडीसीतील बालाजी इंडस्ट्रीजवळील रस्त्यावर त्यांना दोन जणांनी अडविले यावेळी एका इसमसाने त्यांना तु भाई झाला का, पोलीस स्टेशनला का आला होता, उतर गाडीच्या खाली असे म्हणला. त्यानंतर दोघांनी राजकिरण याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका तरुणाने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने तरुणावर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत असलेल्या तरुणाने उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार कृष्णा शिंदे व मयूर नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.



