Home » महाराष्ट्र » उबाठाचे भविष्य इतिहास जमा होते आहे ; भाजप नेत्यांचा टोला !

उबाठाचे भविष्य इतिहास जमा होते आहे ; भाजप नेत्यांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात ठाकरे गट व भाजप पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे प्रवक्ते बन यांनी ठाकरे गटावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

जनाब संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली नाही. पण उबाठाच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामना अग्रलेखात म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी गमावली आहे. खरं तर संधी ही उद्धव ठाकरे आणि उबाठाने गमावली आहे. पंतप्रधान मोदी भविष्य घडवत आहे तर उबाठाचे भविष्य इतिहास जमा होत आहे, हे उद्धव ठाकरे आणि उबाठाने लक्षात ठेवावे, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे.

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज आम्ही सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत.आम्ही जनतेची सेवा करत आहोत तर तुम्ही केवळ मेवा खाण्याचे काम करत आहात. आमचा सेवा पंधरवाडा असतो तर तुमचा उबाठाचा मेवा पंधरवाडा असतो हे जनतेला माहिती आहे. मोदी यांनी देशाला विकासाकडे नेण्याचे काम केलं आहे. तुम्ही केवळ अग्रलेख लिहिण्यात धन्यता मानत आहात हे वास्तव आहे.

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा देश प्रगती करत आहे. जनतेचा नेता म्हणून मोदी यांची ओळख आहे. तर तुम्ही पराभवाच्या छायेत अजून देखील जगत आहात. देश पुढे जात असला तरी तुमचे राजकारण मागे फिरत आहे हे इथली जनता जाणते.

नवनाथ बन म्हणाले की, मोदींनी संधी गमावली नाही, तर इतिहास घडवला. राम मंदिराचे शतकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले, कलम 370 हटवले आणि देशाला नवा मार्ग दाखवला. संधी उद्धवजी ठाकरेंनी गमावली. अडीच वर्षांत त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे इतिहास मोदींना ‘युगपुरुष’ म्हणून, तर उद्धवजींना ‘घरबसल्या मुख्यमंत्री’ म्हणून ओळखेल.

नवनाथ बन म्हणाले की, मासाहेब आमच्या सर्व मराठी जनतेच्या आदर्श आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितच कारवाई करतील. मोदींचा वाढदिवस काळा नाही, सुवर्ण दिवस आहे. काळा दिवस तर आणीबाणीचा होता, आणि काळे नेतृत्व राहुल गांधींसारखे आहे, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांच्या ‘मोदींचा वाढदिवस काळा दिवस’ या विधानावर बन यांनी पलटवार केला आहे.

नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच फोडाफोडीचे राजकारण केले आहे. फडणवीस यांनी सर्व समाजाला एकत्र आणले आहे असे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या आरोपावर बोलताना म्हटले आहे. तर राज ठाकरेंनी भारत-पाक सामन्यावर व्यंगचित्र काढण्याऐवजी, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जवानांनी पराक्रम गाजवला तेव्हा त्यांचे अभिनंदन करणारे व्यंगचित्र काढायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *