जळगाव : प्रतिनिधी
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दिवाळी सणानिमित्त जी . एस . ग्राऊंड येथे बचत गटांच्या विविध स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहेत .
भारतातील सर्वात मोठ्या सणामधील एक दिवाळी सण ह्या सणा निमित्त आपण आपले आप्तेष्ट मित्र परिवार ह्यांना विविध खाद्य पदार्थ , भेटवस्तू देत असतो . ह्या सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेले विविध पदार्थाची मेजवाणी ग्राहकांसाठी दिनांक 14 ऑक्टोबर 2025 पासून जी . एस ग्राऊंड वर उपलब्ध होणार आहे.
त्यात प्रामुख्याने दिवाळी सणानिमित्ताने अस्सल तेलात बनविलेले चविष्ट दिवाळी फराळ, चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, फरसाण .इ खाद्य पदार्थ, गाईच्या शेणापासुन बनविलेले धूप, अगरबत्ती, पंचगव्य प्रोडक्ट, दिवाळी सजावटीसाठी हाताने बनविलेले मोती वर्क वस्तू, पणत्या, पूजा थाळी . आकाश कंदिल, तोरण, रांगोळी, फुल माळ, शोभेच्या वस्तू, उटणे, कागदी पिशव्या, मल्टी मिलेट्स खादय पदार्थ, केळी, बटाटा वेफर्स, आंघोळीचे साबण, रोस्टेड मिलेट्स, पुरण पोळी, लाकडी बैल गाड़ी, सर्व प्रकारचे मसाले, गावरान तुप, नानखटाई, खोबरे लाडू, इ खाद्य पदार्थ व दिवाळी साठीच्या विविध शोभिवंत वस्तू ह्या प्रदर्शन व विक्री साठी उपलब्ध राहणार आहेत.
दिवाळी सणा निमित्त मा .ना गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा . ह्यांनी सर्व जिल्हावासीयांना आवाहन केले आहे कि उमेद – च्या बचत गटांच्या दर्जेदार वस्तू खरेदी करून सुखी, समृद्धी दिवाळी साजरी करावी, तथा मा . मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल व मा प्रकल्प संचालक राजू लोखंडे ह्यांनी सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी / अधिकारी ह्यांनी बचत गटांच्या वस्तुचा लाभ घ्यावा व ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या वस्तू / पदार्थ खरेदी करून त्यांच्या उन्नतीत हातभार लावावा असे आवाहन केले आहे .
