पाचोरा : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या मावस काकाला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ठाणे येथे चुलत काकाकडे गेली असताना त्याने तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर गावाकडे येऊन त्याने अत्याचार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. बदनामी होईल या भीतीने कुटुंबीयांनी तिचा गर्भपात केला. या प्रकरणी अत्याचार करणारा आरोपी पोलिस काका, मुलीची आई, आजी, डॉक्टरसह एकूण सहा जणांविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले. या प्रकरणात यापूर्वी अटक केलेले दोघे न्यायालयीन कोठडीत असून इतर तीन जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.



