यावल : प्रतिनिधी
येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक कृत्य तर सासरे आणि नंदोईने अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलिसांत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सासरे, नंदोई यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय पीडित विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, त्यांचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला होता. या तरुणाने त्यांना बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. तर विवाहितेने पैसे आणले नाहीत, या रागातून पतीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच पतीच्या कामासाठी पैसे आणत नाही, याच रागातून तिचे सासरे आणि नंदोई या दोघांनी ही या पीडित विवाहितेवर अत्याचार केला. तसेच हा प्रकार जर तू कुणाला सांगितला, तर तुला, तुझ्या वडिलांना आणि भावाला मारून टाकु, अशी धमकी दिली. ही घटना ११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली होती. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



